देश

जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केला ग्रेनेड हल्ला

विनायक होगाडे

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी आज मंगळवारी सुरक्षा दलावर निशाणा साधला. सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला असून यामध्ये काही नागरिक देखील जमखी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची अधिक माहिती येणे अद्याप बाकी आहे.

आज २ वाजून ४० मिनिटांनी एका दहशतवाद्याने SSB च्या बंकरला ग्रेनेडने लक्ष्य केले. यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना कोणतीही इजा झालेली नाही, अशी माहिती सीआरपीएफचे DIG किशोर प्रसाद यांनी दिली आहे.

हरि सिंह हाय स्ट्रीट भागामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेडचा हल्ला केला. मात्र, त्यांच्या या हल्ल्यामध्ये निशाणा चुकल्यामुळे ग्रेनेड रस्त्यावर पडलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या अचानक झालेल्या स्फोटामुळे चार ते पाच स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. यासोबतच हल्लेखोरांच्या शोधासाठी संबंधित भागामध्ये तपासकार्य सुरु करण्यात आले आहे.

याआधी सकाळीच दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील जैनपोरामधील कालचक्र भागात सीआरपीएफवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT