Jammu and Kashmir Police
Jammu and Kashmir Police esakal
देश

सैन्यानं घेतला बदला, सरपंचाची हत्या करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ डिजिटल टीम

खनमोहमधील सरपंच समीर अहमद यांच्या हत्येतही या दोघांचा सहभाग होता.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरा त्रालमध्ये बुधवारी सकाळी सुरक्षा दलाला (Indian Army) मोठं यश मिळालंय. इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. या भागातील ऑपरेशन संपल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दिलीय. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे (Terrorist) मृतदेह आणि चकमकीच्या ठिकाणाहून जप्त केलेली शस्त्रं सुरक्षा दलांनी ताब्यात घेतली आहेत. दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहिमही सुरू केलीय. या भागात आणखी कोणतेही दहशतवादी नसल्याची पुष्टी झाल्यावर सुरक्षा दलांनी ऑपरेशन संपल्याची घोषणा केलीय.

ट्विटव्दारे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, अवंतीपोरातील त्राल भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये अन्सार गजवातुल हिंदचा दहशतवादी सफत मुझफ्फर सोफी उर्फ ​​माविया आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी उमर तेली उर्फ ​​तल्हा यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात खनमोहमधील सरपंच समीर अहमद यांच्या हत्येतही या दोघांचा सहभाग होता, असं नमूद केलंय.

दरम्यान, अवंतीपोरातील त्राल भागात दहशतवादी दिसल्यानंतर एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफच्या (CRPF) जवानांनी इथं संयुक्त कारवाई केली होती. सुरक्षा दलाचे जवान जेव्हा दहशतवाद्यांचा शोध घेत होते, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना त्यांच्या जवळ येत असल्याचं पाहून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर देण्यापूर्वी जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, परंतु त्यांनी शस्त्रं ठेवण्यास नकार दिल्यानं सुरक्षा दलांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांना ठार मारलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : राहुल अन् प्रियांका गांधींनी देशाची माफी मागावी; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT