engineer rashid 
देश

Jammu Kashmir Assembly Election : '...तोपर्यंत सरकार स्थापन करू नये!', रशीद इंजिनिअर यांचे जम्मू-काश्‍मीरमधील पक्षांना आवाहन

Jammu Kashmir Politics : जोपर्यंत केंद्र सरकार राज्याचा दर्जा बहाल करत नाही तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू नये, असे आवाहन रशीद इंजिनिअर यांनी सोमवारी केले.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जोपर्यंत केंद्र सरकार राज्याचा दर्जा बहाल करत नाही तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू नये, असे आवाहन अवामी इतेहाद पार्टीचे (एआयपी) प्रमुख आणि उत्तर काश्मीरचे खासदार शेख अब्दुर रशीद ऊर्फ रशीद इंजिनिअर यांनी सोमवारी केले.

येथे आयोजित पत्रकार परिषद रशीद म्हणाले, ‘‘केंद्राने जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करेपर्यंत सरकार स्थापन करू नये, अशी उद्या निवडणूक जिंकणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना माझी सूचना आहे. माझ्या सूचनेला सर्वांनी सहमती दिल्यास ‘एआयपी’ देखील या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देईल.’’

रशीद म्हणाले, की राज्यातील दरबार प्रथा बंद करून जम्मू-काश्मीरच्या तिजोरीवर मोठा बोजा कमी झाला असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. जम्मू आणि काश्‍मीर या दोन्ही प्रदेशातील लोक यात भरडले गेले आहेत, हे वास्तव आहे. यामुळे या दरबार प्रथा पुन्हा सुरू करावा अशी आमची मागणी आहे.

‘सत्तेला प्राधान्य नाही’

जर जम्मूमध्ये भाजपला बहुमत मिळाले आणि काश्‍मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स पक्ष विजयी झाला तर ‘एआयपी’ कोणाला पाठिंबा देणार, असे विचारले असता ते म्हणाले, की माझ्या पक्षाचे प्राधान्य सरकार स्थापनेला नव्हते तर जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यास होते. ‘‘जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने प्रतिनिधी नियुक्ती करून प्रशासनाने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक विधान, एक निशान आणि एक प्रधान’ या कल्पनेला आव्हान दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT