terrorists killed Sakal
देश

Jammu & Kashmir: बारामुल्ला जिल्ह्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

ही कारवाई कालपासून चालू असून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी चालू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : जम्मूमधील बारामुल्ला जिल्ह्यातील परिसरात सुरक्षा दलाच्या जवानाकडून आत्तापर्यंत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही कारवाई कालपासून चालू असून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी चालू आहेत. ही कारवाई अजूनही चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

(Four Terrorist's Killed In Jammu & Kashmir)

दरम्यान आज पहाटे जम्मू-काश्मीरमधील जलालाबाद सुंजवान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीमरण आले असून इतर चार जण जखमी आहे.

बारामुल्ला जिल्ह्यातील घाट परिसरात कालपासून या चकमकी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितल. या चकमकीत काल सुरक्षा दलाचे तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून आणि जवानांकडून संयुक्त कारवाई सुरु होती. त्यादरम्यान आत्तापर्यंत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

तसेच आज पहाटे जलालाबाद सुंजवान भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या भागाला वेढा घातला होता. या चकमकीत सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल यांना वीरमरण आले आहे.

जम्मू काश्मीर भागात दहशतवाद्यांच्या कारवाया सारख्या वाढत असून त्यांच्यावर लष्कराकडून कारवाई करण्यात येत आहे. याअगोदरही बारामुल्ला जिल्ह्यातील पंडीतांना काश्मीर सोडण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून पत्र पाठवण्यात आले होते. त्याअगोदर एका गावातील सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अशा अनेक घटना घडत असताना बारामुल्ला परिसरात कालपासून सुरु असलेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT