Jammu Kashmir Encounter esakal
देश

Jammu Kashmir : शोपियानमध्ये दहशतवादी-लष्करांत पुन्हा चकमक; 3 दहशतवादी ठार, परिसरात नाकाबंदी

शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहितीये.

या चकमकीत लष्कर या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवली जात असल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी (Kashmir Zone Police) सांगितलं. शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा दलाच्या पथकानं तपास मोहीम सुरू केली. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम तीव्र केलीये.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील वाथू शिरमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. यावेळी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT