kashmir 
देश

पुलवामात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दहशतवाद्यांचे तळही उद्ध्वस्त केले आहेत. काश्मीर विभागीय पोलिसांनी ट्विट करून एन्काउंटरची माहिती दिली होती. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. सध्या परिसरात शोध मोहिम राबवण्यात येत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुलावामात इंटरनेट सेवा बंद केली आहे. 

सुरक्षा दलांना काकपोराच्या समबोरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरु झाला. त्याला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनीसुद्धा गोळीबार केला. परिसरात जवान तैनात करण्यात आले असून परिसराला घेरलं आहे.

याआधी गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांकडून श्रीनगर आणि सोपोरमध्ये तीन हल्ले झाले आहेत. याआधी 29 मार्चला सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी भाजपचे प्रदेश सचिव आणि बीडीसी अध्यक्ष फरीदा खान यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका पीएसओसह दोघांचा मृत्यू झाला होता. बैठक सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT