Grenade Attack in Jammu Kashmir Team eSakal
देश

जम्मू काश्मीर : श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला; एक जण ठार, २० जखमी

हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे.

सुधीर काकडे

श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीट भागात रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून, जवळपास २० जण जखमी झाले आहेत. श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सव्वाचार वाजता हा हल्ला झाला आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सुरक्षा दलांनी परिसरात कडक बंदोबस्तात शोध मोहीम सुरु केली आहे.

श्रीनगरमधील या ग्रेनेड हल्ल्यामागे नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजलेलं नाही. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. श्रीनगरमधील अमृता कादल मार्केटमध्ये हा हल्ला झाला. यावेळी तिथे मोठी गर्दी होती. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान श्रीनगरमध्ये हा हल्ला झाला आहे. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांनी अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT