देश

काश्मीरमध्ये गरुड पथकातील कमांडो हुतात्मा

वृत्तसंस्था

बंदीपुरामध्ये चकमक; दोन दहशतवादीही ठार

श्रीनगर: जम्मू- काश्‍मीरच्या बंदीपुरा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि "लष्करे तैयबा' या संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, तर भारतीय हवाई दलाच्या "गरुड पथका'तील दोन कमांडो हुतात्मा झाले. बंदीपुरातील हाजीन भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी आज पहाटेच तपास मोहीम सुरू केली होती. भारतीय जवानांशी सामना होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

प्रशिक्षण आणि अनुभवाच्या उद्देशाने या मोहिमेत सहभागी झालेले हवाई दलाच्या गरुड पथकातील दोन कमांडो दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाले होते. या दोघांनाही लष्कराच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. सार्जंट मिलिंद किशोर आणि कॉर्पोरल नीलेश कुमार अशी त्यांची नावे आहेत. या चकमकीमध्ये ठार झालेले दहशतवादी हे "लष्करे तैयबा' या संघटनेचे असून अली ऊर्फ अबू माझ (पाकिस्तानी) आणि नसरूल्लाह मीर (स्थानिक) अशी त्यांची नावे आहेत. या चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी यापूर्वीही हल्ले केले असल्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. या दहशतवाद्यांच्या ताब्यातून दोन रायफली, एक पिस्तूल, हॅंडग्रेनेड, 12 काडतुसे आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

प्रथमच गरुड कमांडो लक्ष्य
नव्वदच्या दशकामध्ये काश्‍मीर खोऱ्यामध्ये दहशतवादाने उसळी घेतल्यानंतर प्रथमच एखाद्या चकमकीमध्ये गरुड पथकाचे जवान हुतात्मा झाले आहेत. तत्पूर्वी 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये गरुड पथकाचा एक कमांडो हुतात्मा झाला होता. आजच्या मोहिमेमध्ये विशेष कृती पथक, पोलिस आणि लष्कराचे जवान सहभागी झाले होते.

उत्तर काश्‍मीरमध्ये शोधमोहीम
"लष्करे तैयबा'च्या दोन दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा दलांनी उत्तर काश्‍मीरमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. विशेष तपास पथक आणि काश्‍मीर पोलिस संयुक्तपणे ही मोहीम राबवीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील सर्व एक्‍झिट पॉइंट सील करण्यात आले असून आतपर्यंत जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT