file photo 
देश

शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी

वृत्तसंस्था

श्रीनगरमधील प्रकार; पोलिसांकडून तपास सुरू

जम्मू: अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मोहंमद ईसा फझीलने आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून दहशतवादाचा मार्ग निवडल्याची घटना जम्मू आणि काश्‍मीरमध्ये समोर आली आहे. "एके-47' या बंदुकीसोबत त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.

श्रीनगरमधील सौरा भागात असलेल्या शादाब कॉलनीत राहणारा मोहंमद राजौरीतील बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठात बी.टेक.चे (आयटी) शिक्षण घेत होता. अचानक 17 ऑगस्ट रोजी तो वसतिगृहातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर दोन- तीन दिवसांनी हातात रायफल घेतलेली छायाचित्रे त्याने फेसबुकवर टाकून आपण जिहादमध्ये सामील झाल्याची माहिती दिली.

फेसबुकवरील माहितीनुसार, तो अल कायदाच्या उपसंघटनेत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांसमोर आव्हान
मोहंमद हा दोन महिन्यांच्या सुटीमुळे त्याच्या घरी गेला होता. या काळात तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तो बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या पालकांना कळविण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, ते रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT