Indian army  Team eSakal
देश

पूंछमध्ये दहशतवाद्यांचा खेळ खल्लास; ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात

गेल्या 14 दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमकी सुरू आहेत.

सुधीर काकडे

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी मोहिमेत आज सकाळी दोन पोलीस आणि एक लष्करी जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी पुंछमधील जंगलात लष्कर आणि पोलिस संयुक्त शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारानंतर जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांचे म्हणणे आहे की अतिरेक्यांना अत्यंत लहान भागात घेरण्यात आले असून ते फार काळ टीकू शकणार नाही.

पुंछच्या भट्टा डुरियनच्या जंगलात सकाळपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु होती. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी आणि एक लष्करी जवान जखमी झाले आहेत. गेल्या 14 दिवसांपासून दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक आता शेवटच्या टप्प्यात आली असून, लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, लष्कराने अतिरेक्यांना अत्यंत लहान भागात घेरले आहे. आता अंतिम हल्ला कधीही होऊ शकतो.

दरम्यान, आतापर्यंत या चकमकीत सैन्याच्या दोन जेसीओसह नऊ सैनिक शहीद झाले आहेत. त्यामुळे चकमकीला कितीही वेळ लागला तरी आता कोणाचेही नुकसान होऊ नये यासाठी लष्कर पावले उचलत आहे. यापूर्वी 19ऑक्टोबर रोजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी पूंछमध्ये सुरू असलेल्या चकमकीची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली होती. 10 ऑक्टोबरपासून जंगलात दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. यापूर्वी पुंछच्या डेरावाली गलीमध्ये 10 ऑक्टोबरच्या रात्री दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. यामध्ये जेसीओसह पाच जवान शहीद झाले होते. यानंतर दहशतवाद्यांच्या या टोळीचा शोध घेत लष्कराचे जवान 14 ऑक्टोबरला पुंछच्या नार खासच्या जंगलात गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Miraj Expansion : कुठे वाढणार महापालिकेचा विस्तार? तीनही शहरांचे केंद्र बदलले; 'या' भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडणार?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT