Jammu Kashmir  tragedy averted in Pulwama police recover IED arrested ishfaq with ied
Jammu Kashmir tragedy averted in Pulwama police recover IED arrested ishfaq with ied  
देश

Jammu Kashmir : धक्कादायक! पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला! ५ ते ६ किलो IEDसह एकाला अटक

रोहित कणसे

पुलवामा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. पोलिसांनी इशफाक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून ५ ते ६ किलो आयईडी जप्त करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

दक्षिण काश्मीरच्या या जिल्हा पुलवामा येथे एका दहशतवाद्याच्या सहकाऱ्याला 5 किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईससह (IED) अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या ओजीडब्ल्यूचे नाव इश्फाक अहमद वानी असे आहे.

राज्य पोलिसांनी या OGW ला पुलवामाच्या अरिगाम भागातून शोध मोहिमेदरम्यान अटक केली. पकडलेल्या दहशतवादी सहकाऱ्याच्या खुलाशाच्या आधारे, 5-6 किलो वजनाचा पूर्वनिर्मित IED जप्त करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांत G20 बैठकीपूर्वी सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला करण्यासाठी आयईडीचा वापर केला जाणार असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT