Jamsetji Tata Sakal
देश

जमशेटजी टाटा जगातील ‘श्रीमंत दानशूर’

अमेरिकी व युरोपिय दानवीरांचे वर्चस्व असले तरी जमशेटजी टाटा हे जगातील सर्वांत परोपकारी व्यक्ती ठरले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जगातील एक अब्जाधीश वॉरन बफे यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा राजीनामा देताना संस्थेला कोट्यवधी रुपयांची देणगीही (Donation) दिली. जगातील १०० वर्षांतील ५० दानशूर व्यक्तीची यादी ‘हरुन रिसर्च’ (Harun Research) आणि ‘एडलगिव्ह फाउंडेशन’ (Edelgive Ffoundation) यांनी तयार केली असून भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे यात प्रथम स्थानावर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा (Jamshetji Tata) यांचे नाव आहे. ‘भारतीय उद्योगाचे पितामह’ असलेल्या जमशेटजी टाटा यांनी १०२.४ अब्ज डॉलरचे दान केले आहे. (Jamshetji Tata is the Richest Philanthropist in the World)

‘हरुन’ संस्थेचे अध्यक्ष व मुख्य संशोधक रूपर्ट हुगवेर्फ म्हणाले की, अहवालानुसार या यादीत अमेरिकी व युरोपिय दानवीरांचे वर्चस्व असले तरी जमशेटजी टाटा हे जगातील सर्वांत परोपकारी व्यक्ती ठरले आहेत. संस्थेच्या अहवालानुसार जमशेटजी टाटा यांनी ‘त्यांच्या अधिकृत संपत्तीपैकी ६६ टक्के संपत्तीचे दान केले. त्यांनी १८९२ मध्ये उच्च शिक्षणासाठी ‘जेएन टाटा इन्डोमेंट’ची स्थापना केली होती. त्या माध्यमातून त्यांनी देणगी, मदत देण्यास सुरुवात केली.

यादीत अझीम प्रेमजीही

‘हरुन’च्या यादीत बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी ७४.६ अब्ज डॉलरचे दान केले आहे. समाजपयोगी कामांसाठी सुमारे २२ अब्ज डॉलरची देणगी देणार दुसरे भारतीय नाव म्हणजे विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी. त्यांचे नावही यादीत बाराव्या स्थानी आहे. त्यांनी २०१० पासून ‘विप्रो’तील ६७ टक्के वाटा दान केला आहे. विप्रो व अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या वतीने कोरानाविरुद्ध लढा देण्यासाठी आतापर्यंत १५ कोटी डॉलर देणगी दिली आहे.

यादीतील ठळक मुद्दे

  • अल्फ्रेड नोबेल यांच्यासारख्या काही दानवीरांचे नाव नाही

  • अमेरिकेचे ३९, ब्रिटनचे पाच आणि चीनच्या तीन दानवीरांचा समावेश

  • ५० पैकी ३६ दानकर्त्यांचे निधन झाले आहे. यादील १३ व्यक्तीच हयात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT