Jharkhand Train Accident News  esakal
देश

Jamtara Train Accident : आगीतून वाचण्यासाठी रेल्वेतून उड्या; झारखंडमध्ये १२ जणांना ट्रेनने उडवले, दोघांचा मृत्यू

Jharkhand Train Accident News : झारखंड राज्यातील जामतारा येथून एक मोठी बातमी येत आहे. जामतारा-करमाटांर येथील कलझारियाजवळ तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवाने एवढ्या लोकांचा मृत्यू झाला.

संतोष कानडे

Jharkhand Train Accident News : झारखंड राज्यातील जामतारा येथून एक मोठी बातमी येत आहे. जामतारा-करमाटांर येथे कलझारियाजवळ दोघांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. शिवाय १२ प्रवाशी जखमीदेखील आहेत.

अंग एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. तेवढ्यात समोरुन आलेल्या झाझा-आसनसोल या ट्रेनने प्रवाशांना धडक दिली. काही प्रवाशांना ट्रेनने धडक दिली. याच घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १२ जण जखमी झाले.

घटनास्थळी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. अंग एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रेनला अचानक थांबवण्यात आलेलं होतं. तेवढ्यात घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल ही गाडी प्रवाशांना चिरडून निघून गेली.

अपघातामध्ये मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालं आहे. रात्री ९ वाजेपर्यंत दोन जणांची ओळख पटवण्यात आलेली होती. एकाचं नाव मनिष कुमार असल्याचं सांगितलं जातंय. त्याचं आधार कार्ड रेल्वे ट्रॅकवर सापडलं आहे. दुसरं नाव सिकंदर कुमार असून त्याच्या वडिलांचं नाव आदिकाल यादव असं आहे. तो धपरी झाझा जमुई येथील रहिवाशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर आमदार निवासात राहण्याची वेळ, सव्वा वर्षापासून अधिकृत निवासस्थानाच्या प्रतीक्षेत

Latest Marathi News Live Update : वईतील आरे कॉलनीत बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीपोलिसांकडून तपास सुरू

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

SCROLL FOR NEXT