Jawaharlal Nehru avoided to go Somnath Jyotirlinga temple installation of idol Sanjay Sonawani article PM Modi Ayodhya Ram Temple
Jawaharlal Nehru avoided to go Somnath Jyotirlinga temple installation of idol Sanjay Sonawani article PM Modi Ayodhya Ram Temple  
देश

Ayodhya Ram Mandir : नेहरू कार्यक्रमालाही गेले नाहीत अन् गवगवाही केला नाही; सोमनाथ मंदिरावेळी घालून दिला होता आदर्श

रोहित कणसे

अयेध्योतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान काँग्रेससह अनेक विरोधीपक्षांनी आपल्याकडू या सोहळ्याला कोणीही जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. इतकेच नाही तर या सोहळ्याचा भाजपकडून राजकीय प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे.

यादरम्यान लेखक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी त्याच्या फेसबुक वॉलवर एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी सोमनाथ येथील जोतिर्लिंग मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळचा प्रसंग सांगितला आहे. यावेळी तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धार्मिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी सामील होऊ नये हा संकेत पाळत कार्यक्रमात जाण्याचं टाळलं होतं असे सोणवणी यांनी सांगितलं आहे.

सोणवणी लिहीतात की, "सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले. शिव-शक्तीने व्यापलेल्या समस्त देशवासियांची त्यावर अढळ श्रद्धा. हे मंदिर गझनीच्या मोहमदाने अकराव्या शतकात हे मंदिर व तेथील व्यापारी बंदर याची फार मोठी नासधूस केली. त्यानंतर अवघ्या शतकभरातच सम्राट कुमारपाल सोलंकी याने या मंदिराचे भव्य पुनर्निर्माण केले. कुमारपालाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना अपरिचित आहे असे म्हटले तरी चालेल. माझी “अखेरचा सम्राट” ही कादंबरी सोडली तर मराठीत त्याच्याबद्दल विशेष लेखन झालेले नाही."

"तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीच्या हल्ल्यात हे मंदिर पुन्हा उध्वस्त झाले. सौराष्ट्राचा राजा चुडासमा (पहिला) याने चवदाव्या शतकात हे मंदिर पुन्हा उभारले. १६६५ साली औरंगजेबाने हे मंदिर पुन्हा उध्वस्त केले. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर यांनी या उध्वस्त मंदिराच्या स्थानी बांधलेल्या मशिदीच्या शेजारीच सोमनाथचे नवे भव्य मंदिर उभारले."

"स्वातंत्र्यानंतर जुनागढ संस्थान भारतात सामील झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराची पुनर्स्थापना करण्याचे मनावर घेतले. पटेल कन्हैय्यालाल मुन्शीसोबत महात्मा गांधीजींना भेटायला गेले व आपला संकल्प सांगितला. गांधीजीनी या प्रस्तावास समर्थन दिले आणि लोकवर्गणीतून हे मंदिर उभे करायचा सल्ला दिला. तेथे असणारी मशीद हटवण्याची जबाबदारी मुस्लिमांनी घेतली. गांधीजींची दुर्दैवाने हत्या झाली व सरदार पटेल यांचाही लवकरच मृत्यू झाला. त्यामुळे मुन्शी आणि पंडित नेहरू यांनी पुनर्बांधणीचे काम हाती घेतले." असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेहरूंनी घालून दिला होता आदर्श

"११ मे १९५१ रोजी मंदिराचे काम पूर्ण होऊन त्याचे ज्योतीर्लीन्गाच्या पुनर्स्थापनेचा कार्यक्रम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाला. धार्मिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी सामील होऊ नये हा संकेत पाळत पंडीत नेहरू कार्यक्रमाला गेले नाहीत." असेही सोनवणी यांनी अधोरेखित केलं आहे.

"भारताचा मानबिंदू असलेल्या ज्योतीर्लीन्गाच्या पुनर्स्थापनेचा कसलाही गवगवा केला गेला नाही कि कसलाही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. दोन धर्मात फुट पाडण्याचे अपवित्र कार्यही कोणी केले नाही. मुस्लिमांनी सामोपचाराने मशीद हलवली...तिला पाडण्यासाठी कसलेही आकांडतांडव करावे लागले नाही अथवा हिंसेचे तुफान माजवावे लागले नाही. सोमनाथची पुनर्स्थापना हा भारतीय परंपरेतील एक सुवर्णाध्याय आहे." असेही संजय सोनवणी हे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT