HD DeveGowda LokSabha Election esakal
देश

Loksabha Election : लोकसभेची निवडणूक JDS स्वतंत्रपणे लढणार; भाजपसोबत युती केलेल्या माजी पंतप्रधानांची मोठी घोषणा

आम्ही लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढू. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून योग्य त्या ठिकाणी उमेदवार उभे करू.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकात भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. धजद आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढेल, असे पक्षाचे सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. DeveGowda) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, धजद आणि भाजप (BJP) यांच्यातील मैत्रीचा पर्यायही खुला असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

देवेगौडा म्हणाले, ‘‘बंगळूर येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. कारण, कर्नाटकातील काँग्रेसचा एक गट धजदला विरोध करीत होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धजदला निमंत्रित करावे, असे सांगूनही त्याला विरोध झाला.’’

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, त्यांचा पक्ष कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या विरोधात विविध मुद्द्यांवर भाजपसोबत एकत्र काम करेल. आणि लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे.

आम्ही लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढू. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून योग्य त्या ठिकाणी उमेदवार उभे करू. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारला त्यांच्या पक्षाने कसा पाठिंबा दिला होता, याची आठवण करून दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुका धजद आणि काँग्रेसने एकत्र लढल्या होत्या.

त्यावेळी कर्नाटकात भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. धजद आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या निवडणुकीत तुमकूर लोकसभा मतदारसंघात देवेगौडा यांचाही पराभव झाला होता.

१७ जुलै रोजी बंगळूर येथे झालेल्या बैठकीसाठी विरोधी पक्षांनी त्यांना का आमंत्रित केले नाही, या प्रश्नावर देवेगौडा म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसच्या एका गटाने त्यांच्या उपस्थितीला विरोध केला होता. काँग्रेसच्या एका गटाने देवेगौडा यांना निमंत्रण दिल्यास ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी धमकी दिली होती.

त्यामुळे आपल्याला बोलावले नाही. मे महिन्यात २२४ जागांसाठी झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत धजदला फक्त १९ जागा मिळाल्या. १९८३ पासून पक्ष आजपर्यंत अस्तित्वात आहे आणि यापुढेही राहील’’, असे देवेगौडा म्हणाले.

कुमारस्वामींचा अंतिम निर्णय

विधानसभेतील १९ आमदार, सात विधान परिषद सदस्य आणि प्रमुख नेत्यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली आणि जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी कार्यक्रम आखले, पण कुमारस्वामी परदेशातून परतल्यानंतर कार्यक्रमाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे देवेगौडा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT