JEE aspirant died in Rajasthan Kota 
देश

मॉम-डॅड, हाच शेवटचा पर्याय होता; 18 वर्षीय विद्यार्थीनीने कोटामध्ये संपवलं जीवन

JEE aspirant died in Rajasthan Kota: JEE परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थीनीने राजस्थानच्या कोटामध्ये आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांच्या नावे एक सुसाईड नोट लिहिली आहे.

कार्तिक पुजारी

जयपूर- JEE परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थीनीने राजस्थानच्या कोटामध्ये आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांच्या नावे मन सुन्न करणारी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने लिहिलंय की ती JEE परीक्षा देऊ शकत नाही. तरुणीने परीक्षेला दोन दिवस शिल्लक असताना आत्महत्या केली आहे.

कोटामधील ही आठवड्यातीत आणि वर्षातील दुसरी आत्महत्या आहे. आत्महत्या करणारी तरुणी निहारिका जीईई मेन्स परीक्षेची तयारी करत होती. तिने कोटामधील शिक्षा नगरीतील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निहारिकाची परीक्षा ३१ जानेवारीला होती.(EE aspirant died in Rajasthan Kota and left note for her parents stating that she was unable to do JEE)

निहारिका हिने सुसाईड नोटमध्ये लिहिलेला मजकूर मन हेलावून टाकणारा आहे. तिने आपल्या पत्रामध्ये 'सर्वात वाईट मुलगी' आणि 'हाच शेवटचा पर्याय होता' असे शब्द वापरले आहेत. तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, मॉम-डॅड, मी जेईई करु शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मी एक लूझर आहे. मी स्वत:च याला कारण आहे. मी खूप वाईट मुलगी आहे. सॉरी मॉम-डॅड. हाच शेवटचा पर्याय होतो.

२३ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या आणखी एका विद्यार्थ्याने कोटामध्ये आत्महत्या केली आहे. तो कोटातील एका खासगी कोचिंगमध्ये NEET ची तयारी करत होता. १७ वर्षाच्या मोहम्मद झैद हा हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

कोटा हे जितकं शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे. इंजिनियरिंग, मेडिकल प्रवेश परीक्षांची तयार करण्यासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी कोटा येथे येत असतात. २०२३ मध्ये कोटात २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. जिवघेणी स्पर्धा आणि पालकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा यामुळे विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य बिघडते आणि ते टोकाचं पाऊल उचलतात.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT