exam 
देश

JEE Main Result 2021: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

सकाळ डिजिटल टीम

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई) मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. या परीक्षेला एकूण ६,५२,६२७ विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना  www.nta.ac.in, www.ntaresults.nic.in, www.jeemain.nta.nic.in या वेबसाईट्सवर आपला निकाल पाहता येईल. बीई आणि बीटेकच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. 
 

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांक यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये निशांक म्हणाले, "फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई (मुख्य) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सर्वांचे अभिनंदन. गेल्या वर्षापर्यंत ही परीक्षा ३ भाषांमध्ये घेण्यात येत होती. मात्र, यावेळी ही परीक्षा १३ भारतीय भाषांमध्ये घेण्यात आली. परीक्षेनंतर १० दिवसांमध्ये निकाल जाहीर करत एनटीएनं मोठी कामगिरी केली आहे."

सहा विद्यार्थ्यांनी मिळवले १०० एनटीए गुण

फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या या मुख्य परीक्षेत सहा विद्यार्थ्यांनी १०० एनटीए गुण मिळवले आहेत. तर ४१ विद्यार्थ्यांचा टॉपर्सच्या यादीत समावेश झाला आहे. १०० एनटीए गुण मिळवणाऱ्या सहा विद्यार्थ्यांमध्ये साकेत झा (राजस्थान), प्रवर कटारिया (दिल्ली), रंजिम प्रबल दास (दिल्ली), गुरमृत सिंग (चंदीगड), सिद्धांत मुखर्जी (महाराष्ट्र) आणि गुजरातचा अनंत कृष्ण किदाम्बी यांचा समावेश आहे.    

'या' दिवशी होणार जेईई अॅडव्हान्स २०२१

यानंतर मार्च, एप्रिल आणि मे २०२१ या सेशनमधील जेईई मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान, मार्चच्या सेशनमधील परीक्षा १५, १६, १७ आणि १८ मार्च रोजी होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षा पास केली आहे ते आता जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. जेईई अॅडव्हान्स २०२१ ही परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठीचा ७५ टक्के पात्रतेचा निकष आता रद्द करण्यात आला आहे. या परीक्षांच्या तारखा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी जानेवारी महिन्यात जाहीर केल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT