

Eknath Shinde
sakal
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात शिवसेनेने संघटनात्मक ताकद वाढवत शेतकरी कामगार पक्षाला धक्का दिला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शेकापशी संबंधित अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.