देश

मला कलेक्टर करा; 20 वर्षांच्या मुलीने का दिलं जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान?

सकाळ डिजिटल टीम

आम्ही भिक मागायला आल्यासारखं वागवतायत, गरीबांसाठी कायतरी व्यवस्था करा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनातला मुलीचा हा व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होणारे व्हिडिओ आपण गंमतीने पाहतो आणि सोडून देतो. त्यातील काही व्हिडिओमागे एखादी हादरवून टाकणारी व्यथाही असते. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात काही विद्यार्थी आंदोलन करताना दिसत आहेत. यातील एक विद्यार्थीनी मला कलेक्टर करा, मी करते मागण्या पूर्ण असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांना देताना दिसते. ती असंही म्हणते की,'तुम्ही मागण्या पूर्ण करू शकत नसाल तर मला कलेक्टर करा, मी तयार आहे कलेक्टर व्हायला.'

झाबुआत (Jhabua) चंद्रशेखर आझाद महाविद्यालय, आदर्श महाविद्यालसुद्धा आहे. तिथंही शिक्षण क्षेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जवळपास ४०० जणांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन नेलं होतं. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थीनींचा समावेश होता. तासभर विद्यार्थ्यांनी सरकार आणि स्थानिक प्रशासनाचा निषेध नोंदवला, तरी एकही अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आला नाही. तेव्हा संतापलेल्या निर्मला चौहान (Nirmala Chauhan) हीने विद्यार्थ्यांच्या मागण्या ओरडून, पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी निर्मला चौहान ही झाबुआतील गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्षात शिकते. व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना ती म्हणते की, यामुळे किमान झाबुआतील विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे तरी लक्ष जाईल. निर्मलाने सांगितलं की, माझा लढा हा झाबुआतील हजारो विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. आर्थिक चणचण भासत असल्यानं अनेकांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. निर्मलाचे लहान बहिण भाऊ आहेत त्यातील फक्त दोघांनाच शिक्षण घेता येतंय.

आम्ही भिक मागायला इथं आल्यासारखं वागवलं जातंय, आम्हा गरीबासाठी काहीतरी व्यवस्था करा, आम्ही इतक्या दूरवरून येतो आदिवासी लोक, भाड्याने रहायला पैसे नाहीयेत इथे. पुस्तकं नाहीत पोरांकडे, ग्राउंड नाही त्यामुळे खेळात सहभागी होणाऱ्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. बसने येणाऱ्यांसाठी बसमध्ये सवलत मिळावी. कृषी कॉलेज असायला पाहिजे, मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांना दूर जाऊन शिक्षण घेण्याइतके पैसे नाहीत असंही निर्मलाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : गुजरातसाठी महाराष्ट्रात जंगलतोड सुरू असल्याचा राज ठाकरेंचा गंभीर आरोप; कर्जतच्या सभेतून भाजपवर हल्लाबोल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT