Jharkhand Accident  
देश

भीषण! गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकची धडक, 15 जण ठार

सकाळ डिजिटल टीम

Jharkhand Road Accident : झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तब्बल 15 जण ठार झाले असून या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

आम्रपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेर कोला गावाजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस आणि ट्रकची थेट धडक झाली. ट्रक गॅस सिलिंडरने भरलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेर कोलाजवळ एक खाजगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरा समोर धडक झाली. अनियंत्रित ट्रक बसवर जोरात आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्ये बहुतांश जण हे बसमध्ये प्रवास करत होते. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली.

या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त प्रवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही बस साहिबगंजहून दुमकाकडे जात होती. पाकूरचे एसपी एचपी जनार्दन यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमधून बरेच लोक रस्त्यावर पडले किंवा जखमी झाले, तर बरेच लोक आत अडकले. जखमी आणि मृतांना बसमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT