electricity esakal
देश

दिल्ली, पंजाबनंतर आता झारखंडमध्येही मोफत वीज; सोरेन सरकारचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 55 ठराव मंजूर केले. याअंतर्गत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्याचे मान्य करण्यात आले आहे. जुनी पेन्शन प्रणाली लागू करणारे झारखंड हे राजस्थान, छत्तीसगडनंतर तिसरे राज्य ठरणार आहे. तसेच मोफत वीज देण्याबाबत देखील सोरेन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (free electricity news in marathi)

याशिवाय अन्न विभागाचा प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यामध्ये अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या ६१ लाख शिधापत्रिकाधारकांना आता दरमहा १ रुपयाला १ किलो हरभरा डाळ मिळणार आहे.

दरम्यान झारखंडमध्ये दरमहा 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येणार आहे. 100 युनिट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे बिल भरावे लागणार नाही. या प्रस्तावाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. आम आदमी पक्षाचं सरकार असलेल्या दिल्ली आणि पंजाबनंतर बिगर 'आप'शासित राज्यात वीज मोफत देणारं झारखंड देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

महाराष्ट्रात शिंदे सरकार देणार वीज मोफत ?

महाराष्ट्रात नुकतचं सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी करून त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता १०० युनिटपर्यंत वीज मोफत करून शिंदे सरकार सामान्यांना दिलासा देणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT