IAS Officer Pooja singhal esakal
देश

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : ईडीच्या अटकेत असलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघल निलंबित

सकाळ डिजिटल टीम

IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केलीय.

झारखंडमध्ये (Jharkhand) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money laundering Case) IAS अधिकारी पूजा सिंघल (Pooja Singhal) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय. अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीनं (ED) काल त्यांना अटक केलीय. अलीकडेच ईडीनं पूजा सिंघल यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या रांची आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यादरम्यान ईडीला 19 कोटींहून अधिक रोख आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत.

दरम्यान, ईडीनं अटक केल्यानंतर आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या (Jharkhand) खाणकाम खात्याच्या सचिव पूजा सिंघल यांना निलंबित करण्यात आलंय. बुधवारी ईडीनं (ED) मोठी कारवाई करत सचिव पूजा सिंघल यांना आज अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. खुंटी आणि इतर ठिकाणी राबवण्यात आलेल्या मनरेगा योजनेच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ईडीनं ही कारवाई केलीय.

पूजा सिंघल यांची मंगळवारी सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा सकाळी पावणेअकरापासून ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांचा जबाब नोंदवला गेला. चौकशीदरम्यान त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अधिक चौकशीसाठी त्यांची कोठडी मिळावी यासाठी त्यांना रांचीतील स्थानिक न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे. दरम्यान, पूजा सिंघल यांच्या निवासस्थानाशिवाय त्यांच्या पतीच्या रांचीतील (Ranchi) रुग्णालयातही ईडीनं छापा टाकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT