New Bill on Fake News eSakal
देश

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

संतोष कानडे

Jharkhand Congress X Account Withheld : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट बंद करण्यात आलेलं आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार याच हँडलवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डीपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

यापूर्वीच झारखंड काँग्रेसचे अधयक्ष राजेश ठाकूर यांना बनावट व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या वतीने २८ एप्रिल रोजी याप्रकरणी एक प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे.

राजेश ठाकूर यांना दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. या प्रकरणी बोलताना झारखंड काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटलं की, दिल्ली पोलिसांकडून मला मंगळवारी नोटीस मिळाली. परंतु हे मला कळत नाहीये की मला नोटीस का पाठवली. हे अराजकतेशिवाय दुसरं काय आहे.

''जर त्यांना काही अडचण असती तर त्यांनी सुरुवातीला माझ्या एक्स अकाऊंटवरील खात्याची पडताळणी करायला हवी होती. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मी प्रचारात व्यस्त असताना त्यांनी मला माझ्याकडे माझा लॅपटॉप आणि इतर सामान मागवलं आहे. माहितीची खात्री केल्याशिवाय समन्स पाठवणं योग्य नाही'' असं ठाकूर म्हणाले.

याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यासह सात राज्यातील १६ नोत्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात राजस्थान, झारखंड, नागालँड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात तपास सुरु केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप जिंकल्यानंतर एससी, एसटी यांचं आरक्षण संपवण्यबद्दल बोललं जात आहे. मात्र शेअर होत असलेला व्हिडीओ एडिट करुन व्हायरल केला जात असल्याच पुढे आलेलं आहे. वास्तविक हा व्हिडीओ २०२३ मधला तेलंगणा येथील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाषणामध्ये मुस्लिम कोटा संपवण्याबद्दल बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT