Jharkhand Floor Test esakal
देश

Jharkhand Floor Test : ''माझ्या अटकेत राजभवनाचा हात'', बहुमत चाचणीपूर्वी हेमंत सोरेन यांचा गंभीर आरोप

झारखंडमधील राजकीय गदारोळानंतर हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला होता. ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, पुढे झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपाई सोरेन यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

संतोष कानडे

Jharkhand hemant soren news : झारखंडमधील राजकीय गदारोळानंतर हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला होता. ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, पुढे झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपाई सोरेन यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

नव्याने स्थापन झालेल्या चंपाई सोरेन सरकारला सोमवारी बहुमत चाचणीला सामोरं जावं लागत आहे. फ्लोर टेस्टच्या पूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM नेते हेमंत सोरेन यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, ३१ जानेवारीच्या रात्री देशात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. मला विश्वास आहे की, या घटनेत राजभवनचाही हात होता.

दुसरीकडे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले, हेमंत सोरेन यांच्यावर झालेला अन्याय संपूर्ण देशाने बघितला आहे. हेमंत यांनी राज्यात केलेलं काम मोठं आहे. प्रत्येक घरात त्यांच्या योजनांचा लाभ पोहोचलेला आहे.

चंपाई सोरेन पुढे म्हणाले, मला सांगायला अभिमान वाटतो की, मी हेमंत सोरेन यांचाच भाग दोन आहे. फ्लोर टेस्टच्या आधी ते विधानसभेला संबोधित करत होते.

झारखंडमध्ये कुणाचं किती संख्याबळ?

81 जागा असलेल्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी 41 सदस्यांचं संख्याबळ आवश्यक आहे. JMMच्या नेतृत्वाखालील युतीकडे 48 आमदाराचं पक्कं बहुमत आहे. यामध्ये JMM चे 29, काँग्रेसचे 17, RJD आणि CPI(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे.

सर्व आमदार फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. एनडीएकडे 29 आमदार आहेत. भाजपकडे 26 जागा आहेत आणि AJSU कडे 3 आहेत. उर्वरित 3 जागा अपक्ष आणि इतरांच्या आहेत.

झारखंडसाठी अनेकांनी प्राण दिले- हेमंत सोरेन

मला तुरुंगात टाकून त्यांची जिंकल्याची भावना असेल, परंतु आम्ही पराभव स्वीकारलेला नाही. हे झारखंड आहे, इथे अनेकांनी प्राणांची आहूती दिलेली आहे. त्यामुळे आम्ही लढून जिंकणार, अशा भावना माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केल्या.

''मला ८.५ एकर जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या नावावरील जमिनीचे कागदपत्र दाखवावेत.. जर घोटाळा सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईन'' असं आव्हान हेमंत सोरेन यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT