jharkhand cm hemant soren  
देश

Hemant Soren: अखेर 5 महिन्यांनंतर हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका! जामीन देताना कोर्टानं केली महत्वाची टिप्पणी

सोरेन यांना दिलासा देताना कोर्टानं महत्वाची टिप्पणी केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

रांची: जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांना झारखंड हायकोर्टानं शुक्रवारी जामीन मंजूर केला. ‘‘प्रथम दर्शनी या प्रकरणात सोरेन हे दोषी असल्याचं आढळत नाही, त्याचप्रमाणं त्यांना जामीन दिल्यास ते काही गैरप्रकार करतील असंही आढळत नाही असं कोर्टानं जामीन देताना म्हटलं आहे,’’ असे त्यांचे वकील अरुणभ चौधरी यांनी माध्यमांना सांगितले. रोंगोन मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे.

ईडीचे म्हणणे

सोरेन यांनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करत सुमारे पावणे नऊ एकर बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोप सक्तवसूली संचालनालयाच्यावतीने (ईडी) करण्यात आला. सोरेन यांनी संबंधित जमिनीच्या मालकीसंबंधीच्या कागदपत्रात फेरफार करण्याचे आदेश दिल्याचे याप्रकरणाच्या तपासादरम्यान सोरेन यांचे माध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद यांनी मान्य केले असल्याचा दावा ईडीने केला आहे.

त्याचप्रमाणे न्यायालयातील युक्तिवादादरम्यान, ईडीच्या वतीने सोरेन यांच्या जामिनास विरोध करण्यात आला. ‘‘सोरेन यांना जामीन केल्यास ते पुन्हा गैरव्यवहार करण्याची शक्यता आहे.’’ असा युक्तिवाद ईडीने केला. सोरेन यांनी झारखंडमधील या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याच्या विरोधात अनुसूचित जाती जमातींसाठीच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा संदर्भ देत ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने १३ जून रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

‘सोरेन निर्दोष’

सोरेन यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा आणि कपिल सिब्बल यांनीही युक्तिवाद केला. ‘‘सोरेन हे निर्दोष असून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. हा संपूर्ण खटलाच राजकीय दृष्ट्याप्रेरित आहे,’’ असा युक्तिवाद सोरेन यांच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला. याप्रकरणी जलद सुनावणी व्हावी अशी मागणी सोरेन यांनी न्यायालयात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT