BJP MP esakal
देश

BJP : भाजप खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारींसह 9 जणांविरुद्ध गुन्हा

'या व्यक्तींनी एटीसी कार्यालयात घुसून सर्व सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं.'

सकाळ डिजिटल टीम

'या व्यक्तींनी एटीसी कार्यालयात घुसून सर्व सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं.'

झारखंड पोलिसांनी (Jharkhand Police) भाजप खासदार (BJP MP) निशिकांत दुबे, त्यांची दोन मुलं, खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari), देवघर विमानतळ (Deoghar Airport) संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. देवघरहून टेक ऑफसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) इमारतीत जबरदस्तीनं घुसून परवानगी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सुरक्षा प्रभारी सुमन आनंद यांच्या तक्रारीवरून 1 सप्टेंबर रोजी कुंडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी सांगितलं की, 'या व्यक्तींनी एटीसी कार्यालयात (ATC office) घुसून सर्व 'सुरक्षा नियमांचं' उल्लंघन केलं आणि उड्डाणाच्या परवानगीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला.' कुंडा पोलिस स्टेशनचे (Kunda Police Station) प्रभारी प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, 'तक्रारीनंतर दोन्ही खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी आणि विमानतळ संचालकांसह नऊ जणांवर आयपीसी कलम 336 (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारं कृत्य), 447-448 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.'

खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी नव्या वादात सापडले आहेत. हे प्रकरण झारखंडमधील विमानतळाच्या सुरक्षा भंगाशी संबंधित आहे. पेट्रोल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अंकिताच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी आणि कपिल मिश्रा यांच्यासह अनेक लोक दुमका इथं पोहोचले होते. यादरम्यान खासदार चार्टर्ड विमानातून देवघर विमानतळावर उतरले होते. यावेळी खासदारासोबत त्यांची दोन्ही मुलंही सहभागी झाली होती. दुमका येथून आल्यानंतर खासदार पुन्हा गावी जाण्यासाठी साडेपाच वाजता विमानतळावर पोहोचले आणि चार्टर विमानात बसले. यावेळी देवघर विमानतळ एटीसीनं विमानाला परवानगी दिली नाही. यानंतर खासदार दुबे, त्यांची दोन मुलं, मनोज तिवारी, सुनील तिवारी यांच्यासह हे सर्व लोक बळजबरीनं एटीसी इमारतीत घुसले आणि अधिकार्‍यांकडून बळजबरीनं मंजुरी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT