Jharkhand Politics Latest News  
देश

Champai Soren : दगाफटक्याचा धोका! जेवणाची वेगळी सोय ते खोल्यांबाहेर २४ तास पहारा; हैदराबादमध्ये आमदारांची शाही बडदास्त

Jharkhand Politics Latest News : झारखंडमधील चंपई सोरेन यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि स्वतःच्या आमदारांना कडेकोट बंदोबस्तामध्ये तेलंगणमधील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद (पीटीआय) : झारखंडमधील चंपई सोरेन यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि स्वतःच्या आमदारांना कडेकोट बंदोबस्तामध्ये तेलंगणमधील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या रिसॉर्टमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे तिथे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था देखील वेगळी ठेवण्यात आली असून खोल्यांच्या बाहेर पोलिसांचा पहारा आहे. सध्या सत्ताधारी पक्षाच्या ४० आमदारांचा मुक्काम हा शमीरपेट येथील लिओनिया रिसॉर्टमध्ये आहे. दोन विशेष विमानांतून त्यांना शुक्रवारीच येथे आणण्यात आले होते.

सध्या या आमदारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरचिटणीस दीपा दास मुन्शी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशिवाय अन्य कुणालाही भेटण्यास या आमदारांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्या मजल्यावर या आमदारांचा मुक्काम आहे तिथे अपरिचित व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या मजल्यावरील मुख्य प्रवेशद्वारावर चोवीस तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आमदारांच्या भोजनाची व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात आली असून तिथे कुणालाही प्रवेश नाही. भाजपचे नेते या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात ही शक्यता लक्षात घेऊनच येथे बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. या रिसॉर्टच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाजप आमदारांनाही निर्देश

चंपई सोरेन यांच्या सरकारची पाच फेब्रुवारीला बहुमत परीक्षा होणार असून त्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या आमदारांना रांचीमध्येच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. काही आमदार हे ऐनवेळी पक्षाला दगा देण्याची भीती वर्तविली जात आहे. काँग्रेसच्या गोटातील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पक्षश्रेष्ठी सावध झाले आहेत.

हेमंत सोरेन विधिमंडळात येणार

विशेष न्यायालयाने आज माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सोमवारी होऊ घातलेल्या बहुमत चाचणीवेळी विधिमंडळात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी सोरेन यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले होते. चंपई सोरेन यांच्या बहुमत चाचणीप्रसंगी आपल्याला विधिमंडळात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जावी अशी विनंती हेमंत सोरेन यांनी केली होती. न्यायालयाने त्याला मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT