Seema Patra Sakal
देश

Jharkhand: आदिवासी महिलेला शौचालय चाटायला लावलं; भाजपा नेत्याला अटक

सकाळ डिजिटल टीम

झारखंडमधून एक धक्कादायक घटना सध्या समोर य़ेत आहे. भाजपाच्या महिला नेत्याने आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेला शौचालय चाटायला लावलं आहे. सीमा पात्रा असं या भाजपा नेत्याचं नाव असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. त्यांनी घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेचा छळ करत तिला मारहाण केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पात्रा यांना अटक केली आहे. (Jharkhand BJP leader Seema Patra)

आपल्या घरात काम करणाऱ्या या आदिवासी महिलेचा पात्रा (Seema Patra) यांनी छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पात्रा यांनी लोखंडी रॉडने या महिलेचे दात तोडले, तसंच अंगावर गरम सळईने चटकेही दिले आहे. पात्रा यांनी या महिलेला जिभेने चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडलं आहे. त्यांना आता झारखंड (Jharkhand) पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपांनंतर भाजपाने तात्काळ त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं.

पात्रा यांच्या घरी काम करणाऱ्या सुनिता यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये त्या स्वतः आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती देत होत्या. या प्रकरणानंतर पात्रा यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालकांना दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT