Jijabai Bhosle birth anniversary will celebrated first time in Delhi  sakal
देश

Delhi News : दिल्लीत प्रथमच मॉंसाहेब जिजाऊंची जयंती साजरी होणार

गुरूवारी विशेष कार्यक्रम

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रथमच राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांची जयंती यंदा प्रथमच भव्य प्रमाणात साजरी होणार आहे.

मराठी महापुरूषांच्या कार्यकर्तत्वाचा जागर करणारे अनेक उपक्रम राबविणाऱया ‘माय होम इंडिया‘ या संस्थेच्या वतीने येत्या १२ जानेवारी रोजी (गुरूवारी) दुपारी ४ वाजता नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग येथे हा कार्यक्रम होणार आहे.

बहुचर्चित ‘जेएनयू‘ च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये प्रथमच राजमाता जिजाऊ यांची जयंती (तारखेप्रमाणे) साजरी होणार आहे.

देवदर यांनी सांगितले की या निमित्ताने हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ मातेचे आभाळाएवढे कर्तृत्व देशाच्या राजधानीमध्ये मांडले जाणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी मातृशक्तीचाही उद्घोष केला जाणार आहे.

माय होम इंडियातर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमास जवाहरलाल नेहरू विद्यापीठीच्या (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि लेखिका शेफाली वैद्य यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT