Shashi Tharoor and  
देश

Bharat Vs India : जिना यांनीही घेतला होता 'इंडिया' नावावर आक्षेप; शशी थरूर यांचं विधान

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : सध्या भारत विरुद्ध इंडिया हा मुद्दा चर्चीला जात आहे. आता या प्रकरणावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही मोठं विधान केलं आहे. भारताला 'भारत' म्हणण्यास घटनात्मक आक्षेप नाही, पण 'इंडिया' नावाचा पूर्णपणे त्याग करण्याइतके सरकार मूर्ख नाही, अशी अपेक्षा थरूर यांनी व्यक्त केली.

थरूर म्हणाले, भारताची स्वतःची ब्रँड व्हॅल्यू आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी देखील इंडिया या नावावर आक्षेप घेतला होता. कारण त्यांच्यामते भारत ब्रिटिश राजवटीचा उत्तराधिकारी राष्ट्र होते, तर पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र आहे.

मंगळवारी G20 शी संबंधित डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'भारताच्या राष्ट्रपती' म्हणून संबोधित करण्यात आले. यावर वाद-प्रतिवाद सुरू झाला. सरकारला देशाचे 'इंडिया'नाव बदलून भारत करायचे असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

याबाबत शशी थरूर यांनी सोशल साइट ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले की, देशाच्या दोन अधिकृत नावांपैकी एक असलेल्या इंडिया 'भारत' म्हणण्यास घटनात्मक आक्षेप नाही. मला आशा आहे की शतकानुशतके प्रचंड ब्रँड व्हॅल्यू असलेले 'इंडिया' हे नाव पूर्णपणे काढून टाकण्याइतके सरकार मूर्ख नाही. थरूर म्हणाले की, इतिहासाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आणि जगभरात ओळखल्या जाणाऱ्या नावावर आपला हक्क सोडण्याऐवजी आपण दोन्ही शब्द वापरत राहिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT