jitanram manjhi was spying on mahagathbandhan allies alleges bihar cm nitish kumar esakal
देश

CM Nitish Kumar : महाआघाडीत जितनराम मांझी हेरगिरी करत होते - मुख्यमंत्री नितीशकुमार

जितनराम मांझी हे भाजपच्या संपर्कात होते असा खळबळजनक दावा

सकाळ वृत्तसेवा

पाटणा - ‘‘जितनराम मांझी हे बिहारमधील महाआघाडीमध्ये हेरगिरी करत होते,’’ असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केला. हिंदुस्तान आवामी मोर्चाचे (सेक्युलर) संस्थापक जितनराम मांझी हे भाजपच्या संपर्कात होते असा खळबळजनक दावा नितीश कुमार यांनी केला आहे.

‘‘ते सातत्याने भाजपच्या संपर्कात होते आणि वारंवार भाजपच्या अनेक नेत्यांना भेटत होते.’’ असे नितीश कुमार म्हणाले. ‘‘मांझी हे २३ जूनच्य बैठकीमध्ये सहभागी होऊ इच्छित होते, मात्र ते बैठकीमधील महत्त्वाची माहिती उघड करतील अशी मला भीती होती म्हणून मी त्यांना त्यांचा पक्ष संयुक्त जनता दलात(जेडीयू) विलिन करण्यास सांगितला; परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळेच मी त्यांना महाआघाडीतून बाहेर पडण्यास सांगितले’’ असे नितीश यांनी माध्यमांना सांगितले.

संयुक्त जनता दलाने मांझी यांना बरेच दिले, त्‍यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जेडीयूच्याच कोट्यातून मंत्रिपद देखील देण्यात आले तरी देखील मांझी यांनी भाजप नेत्यांशी जवळीक केली असा आरोप नितीश यांनी केला.

दरम्यान, मांझी यांचे पुत्र संतोष कुमार यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांनी हिंदुस्तान आवामी मोर्चा हा पक्ष जेडीयूमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याने राजीनामा दिल्याचे संतोष यांनी माध्यमांना सांगितले आहे.

मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता

नितीश कुमार यांनी यावेळी पुन्हा एकदा मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता वर्तविली आहे. ‘‘लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी २३ जूनच्या बैठकीपासूनच निवडणुकीची तयारी करायला सुरुवात करायला हवी’’ असे नितीश यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT