sia sakal media
देश

दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ‘एसआयए’ स्थापण्यास परवानगी

राज्य सरकारच्या गृहविभागाकडून याबाबत आदेश काल जारी करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) धर्तीवर राज्य तपास यंत्रणा (एसआयए) स्थापन करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. ‘एनआयए’ आणि इतर केंद्रीय यंत्रणांबरोबर समन्वय ठेवून ही यंत्रणा काम करणार आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी प्रामुख्याने याची स्थापना करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या गृहविभागाकडून याबाबत आदेश काल जारी करण्यात आले. त्यानुसार ‘एसआयए’मध्ये एका संचालकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच इतर अधिकारी व कर्मचारी असतील. यांची नेमणूक राज्य सरकार करणार आहे. ‘सीआयडी’चे प्रमुख याचे मानद संचालक असतील. मूळ वेतनाच्या २५ टक्के विशेष प्रोत्साहन भत्ता ‘एसआयए’मध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल. सर्व पोलिस स्थानकांच्या प्रमुखांना आपल्याकडील दहशतवादाशी संबंधित प्रकरणांची माहिती ‘एसआयए’कडे देण्यास सांगण्यात आले आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची प्रगती आणि इतर गोष्टींचा आढावा घेऊन पोलिस महासंचालक कोणत्याही प्रकरणाचा तपास ‘एसआयए’कडे सोपवू शकतात. तसेच दहशतवादाशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन ‘एसआयए’ स्वतःहून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवू शकणार आहे. अशा प्रकरणांची माहिती त्यांना पोलिस महासंचालकांना द्यावी लागेल.

या प्रकरणांचा तपास करणार

सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना आर्थिक मदत, बनावट नोटांचा प्रसार, दहशतवादी कट प्रकरणे, दहशतवादाशी संबंधित एनडीपीएस प्रकरणे, अपहरण आणि खून, खंडणी, एटीएम आणि बँक लुटणे, शस्त्रे लुटणे, अपप्रचार आणि भारत सरकारच्या विरोधात खोटा प्रचार आदी प्रकरणांची चौकशी राज्य तपास यंत्रणा (एसआयए) करू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT