Mehbooba Mufti 
देश

"दिल्लीत बसलेले जम्मू-काश्मीरचा प्रयोगशाळेसारखा वापर करतायत"

मोदी सरकारवर केली टीका

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये बसलेले लोक जम्मू-काश्मीरचा प्रयोगशाळेसारखा वापर करत आहेत, असा आरोप पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केला आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुफ्ती म्हणाल्या, जे दिल्लीत बसले आहेत ते जम्मू आणि काश्मीरचा प्रयोगशाळा म्हणून वापर करत असून इथे प्रयोग केले जात आहेत. नेहरु, वाजपेयी यांसारख्या नेत्यांकडे जम्मू आणि काश्मीरसाठी एक दूरदृष्टी होती. पण मोदी सरकार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सरदार आता खलिस्तानी बनलेत, मुस्लिम पाकिस्तानी आणि भाजप हिंदुस्तानी झालाय.

जम्मू-काश्मीरवर मर्यादा घालण्याचं काम अडमुठेपणानं केलं जात आहे. शैक्षणिक संस्थांची नाव बदलण्याच काम सुरु आहे. पण नावं बदलून मुलांना रोजगार मिळणार नाहीए. केंद्र सरकार तालिबान, अफगाणिस्तानबाबत बोलतंय पण शेतकऱ्यांबाबत आणि रोजगाराबाबत बोलायला तयार नाही, असंही मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मोठा डाव खेळला, पंजाबच्या चहलला संघात दाखल करून घेतले; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळवणार?

Marathi Live News update: भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमंजुषा असलेल्या नोट्स मनिषा हवालदार यांनी जाळून केल्या नष्ट

Unseasonal Rain: अवकाळी पावसाने हाहाकार; लाखणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन

Mass Wedding Politics: बोईसरमध्ये २०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीने शिवसेनेत नाराजीची कुजबुज

SCROLL FOR NEXT