JNU s Proposal Study Center for Study of Partition india Pakistan ugc education  sakal
देश

'जेएनयू’चा प्रस्ताव : फाळणीच्या अभ्यासासाठी अध्ययन केंद्र

यूजीसी व केंद्राची मान्यता घेणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताच्या फाळणीचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि ऐतिहासिक माहितीतील त्रुटी दूर करण्यासाठी अध्ययन केंद्र स्थापण्याचा विचार सुरू असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी आज दिली. यासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. फाळणीशी संबंधित घटनांचा अभ्यास करण्यासाठी, तसेच त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर कसा परिणाम झाला, फाळणीच्या वेदना कशा प्रकारे भोगायला लागल्या या बाबत नव्या केंद्रामार्फत अभ्यास करण्यात येईल, असे पंडित यांनी सांगितले.

यासंदर्भातील अभ्यासक्रमही तयार करण्यात येतील. निर्वासितांचा प्रश्‍न आणि त्यांना सक्तीने कसे निर्वासित व्हावे लागले याचा अभ्यास करण्यासाठी नव्या केंद्रामार्फत मदत करण्यात येईल, असेही शांतिश्री पंडित यांनी सांगितले. ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’च्या अंतर्गत हे अभ्यासकेंद्र स्थापन करण्यात येईल, कारण फाळणीच्या घटनेचा परिणाम संपूर्ण दक्षिण आशियावर झाला, असेही शांतिश्री पंडित यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘इतिहासातील निखळलेले दुवे जोडण्याचे काम उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी केले पाहिजे.एखाद्या घटनेची माहिती देण्यासाठी प्रदर्शने भरविणे चांगले आहे, परंतु, तो तात्पुरता उपाय आहे. सखोल अभ्यास होण्यासाठी अध्ययन केंद्र स्थापन करणे हा कायम स्वरुपी उपाय ठरू शकतो, त्यामुळे आम्ही नव्या अभ्यास केंद्राचा प्रस्ताव देणार आहोत.’’

सरदार पटेलांचे नाव?

‘‘फाळणीच्या वेदना भोगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अनुभवांची माहिती व्हावी, त्यांनी लिहिलेली पत्रे सर्वसामान्यांनी अभ्यासावीत. निर्वासितांच्या प्रश्‍नांचाही त्यातून अभ्यास होईल,’’ असेही कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी म्हटले आहे. या अध्ययन केंद्राला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल किंवा जनसंघाचे संस्थापक डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा विचार असल्याचेही पंडित यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करण्यासाठी अध्ययन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा दिल्ली विद्यापीठाने नुकतीच केली आहे. त्यासाठी त्यांनी सात जणांची समितीही स्थापन केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

१६ वर्षांपूर्वी हुप्पा हुय्या म्हणत घडवला इतिहास आता 'बजरंगी' येणार भेटीला; पोस्टरमधील अभिनेत्याला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT