Jagdesh Kumar 
देश

जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरुंची UGC च्या अध्यक्षपदी नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

प्राध्यापक डीपी सिंग यांच्या निवृत्तीनंतर युजीसीच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.

नवी दिल्ली - जेएनयू विद्यापीठाचे (JNU University) कुलगुरु एम जगदेश कुमार (M Jagdesh Kumar) यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार यांच्यासह दोन इतर उमेदवारांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितिन करमाळकर आणि IUAC चे संचालक अविनाश चंद्र पांडे यांचा समावेश होता.

प्राध्यापक डीपी सिंग यांच्या निवृत्तीमुळे युजीसीच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. डीपी सिंग यांची २०१८ मध्ये या पदावर नियुक्ती झाली होती. इंजिनिअरिंग क्षेत्रात नाव कमावलेले जगदेश कुमार यांनी जेएनयु विद्यापीठात चांगलं काम केलं आहे. तसंच गेल्या काही काळात विद्यापीठात घडलेल्या वादग्रस्त घटना त्यांनी हाताळल्या आहेत.

एम जगदेश कुमार यांची २०१६ मध्ये जेएनयुच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली होती. जेएनयुमध्ये जेएनयू स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची सुरुवात त्यांनी २०१८ मध्ये केली. त्यांच्या कार्यकाळात जेएनयुमध्ये अनेक बदल झाले. ३१ जानेवारीला प्राध्यापक जगदेश कुमार यांचा कुलगुरु पदाचा कार्यकाळ संपला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT