JNU
JNU  esakal
देश

शिवजयंतीला दिल्लीच्या JNU मध्ये पुन्हा राडा; फोटो फेकल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजे जेएनयुमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीवरुन, शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरून वाद निर्माण झाला आहे. शिवरायांचा फोटो फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आज तकने दिलेल्या माहितीनुसार, डाव्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा खाली फेकल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केला आहे. तर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा डावे करत आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असून, विद्यापीठाकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

घडलेल्या घटनेचे फोटो अभाविपने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवरायांची प्रतिमा खाली पडलेली दिसत आहे. इतकेच नव्हे तर जमिनीवर हार देखील फेकलेला दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना अभाविपने म्हटले आहे की, डाव्यावाद्यांनी #वीर_शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवरील पुष्पहार काढला आणि महापुरुषांच्या प्रतिमेची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर त्या प्रतिमा खाली फेकण्यात आल्या. अभाविप याचा तीव्र निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT