Jobs 
देश

कोरोना महामारीमुळे 10 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या संकटात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अनेक उद्योग-धंद्यांना मोठा फटका बसला. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश व्यवहार ठप्पच आहेत. तसेच आर्थिक मंदीचे सावटही आहे. परिणामी, असंख्य नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यानंतर आता संसदीय दलाची बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे 10 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असे या पॅनेलने सांगितले. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभागही मोठा होता. 

स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचा मुद्दा

कोरोना व्हायरसमुळे अनेकांना नोकऱ्यांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, असे पॅनेलच्या काही सदस्यांनी सांगितले. तसेच नोकरी ही कोणत्याही कुटुंबासाठी आशादायक गोष्टच आहे.

गुन्हेगारी वाढण्याची शक्यता

नोकऱ्या गेल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकारने रोजगार निर्मिती करण्यासाठी नवे-नवे प्रकार अवगत करायला हवेत, असेही यामध्ये सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टार्टअपवरही भर

पॅनेलच्या सदस्यांनी बैठकीत कोरोनामुळे नोकऱ्यांमध्ये झालेले नुकसान आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक मुद्द्यांवर भर दिला.

20 लाख कोटींचे पॅकेज

20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज उद्योग जगताला मिळाले आहे. त्यामुळे याचा मोठा दिलासा मिळाला आहे. पॅनेलने सांगितले, की 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजने उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. तसेच आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा मार्ग प्रशस्त आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पॅनेलच्या बैठकीत 13 सदस्यांचा सहभाग

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता संसदीय पॅनेलच्या या बैठकीत 31 पैकी 13 सदस्यांनी सहभाग घेतला. काही सदस्यांनी भारत-चीन या दोन देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी उत्पादन आणि पर्यायी स्त्रोतांवरही विचार केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT