Murder esakal
देश

Crime News : धक्कादायक! सात महिन्यांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या अन्…

रोहित कणसे

राजस्थानच्या जोधपूर येथे एक धक्कादायक घटना सोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील चार जणांची कळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच हत्येनंतर मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.

हत्या करण्यात आलेल्या मृतांमध्ये दोन महिला, १ पुरूष आणि एक सात महिन्यांच्या चिमुरडीचा समावेश आहेत. बुधवारी सकाळी या हत्याकांडाची माहिती समोर आली. घटनेते झोपलेल्या चौघांचे गळे चिरण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहांना झोपडीत टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली, असून घटनास्थळी लोकांनी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे.

ग्रामीण पोलिस अधिक्षक धर्मेंद्र सिंह यादव यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. ओसियां पोलिस स्टेशन अंतर्गत रामनगर पंचायत परिसरात गंगाणियो की ढाणी येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळाच्या पाहाणीनंतर हत्या केल्यानंतर मृतदेहांनी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ग्रामीण पोलिस अधिक्षक घटनास्थळी पोहचले. एफएसएल टीम जोधपूर येथून रवाना झाली आहे. दरम्यान जोधपूरचे कलेक्टर हिमांशु गुप्ता देखील घटनास्थाळी पोहचले आहेत.

हे हत्याकांड पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चार जणांची हत्या अंत्यंत निर्घृन पद्धतीने करण्यात आली आहे. खाटेवर झोपलेल्या अवस्थेतच चौघांचे गळे कापण्यात आले आहेत. त्यानंतर झोपडीत टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मध्ये सात महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह जळून खाक झाला पण उरलेले मृतदेह अर्धवट जळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT