johnson vaccine 
देश

'जॉन्सन'च्या सिंगल डोस लशीच्या वापराला भारतात मंजुरी

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार आहे. कारण, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस भारतीयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारताने त्याला हिंरवा कंदील दाखवला आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कोरोना संसर्गाच्या विरोधात लढाईसाठी देशाला आणखी एक लस मिळाली आहे.जॉन्सन अॅंड जॉन्सन या अमेरिकन कंपनीने त्यांच्या कोरोना लशीला भारतात आणीबाणीच्या परिस्थितीत परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. सध्याच्या दोन्ही भारतीय लशींचे दोन डोस घ्यावे लागतात, मात्र जॉन्सनची लस ही एकच डोसची असणार आहे.

कोरोना लसीकरणाची सारी सूत्रे केंद्र सरकारने २१ जूनपासून हाती घेतली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५० टक्के देशवासीयांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला असल्याचे केंद्राने संसदेत नुकतेच सांगितले. मोदी सरकारच्या घोषणेनुसार सर्व नागरिकांना या वर्षाअखेर लस द्यायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागणे अपरिहार्य आहे. त्यादृष्टीने जॉन्सनची चौथी लस उपयुक्त ठरू शकेल.

लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेत विविध राज्यांमध्ये लसीचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार आहे. मिळतील तेथून लसीचा पुरवठा मागवावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. मात्र विदेशी लसीबाबत भारताच्या कायद्याचे पालन करण्याची अट अनेक देशांतील लस उत्पादकांबरोबरच्या चर्चेत अडथळा ठरत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. कारण भारतात लस विकायची तर येथील कायदे व नियम पाळावे लागतील, संबंधित लशीच्या काटेकोर चाचण्या भारतीय नियमांनुसार कराव्याच लागतील, या आरोग्य धोरणात बदल करण्याच्या मनःस्थितीत सरकार नाही. सध्या कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींच्या व्यतिरिक्त रशियाची स्पुटनिक ही लसही उपलब्ध झाली आहे. त्याचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे. जॉन्सनची लस सिंगल डोस आहे. या लसीचा एकच डोस पुरेसा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT