देश

भारतात जुलैमध्ये येणार 'जॉन्सन'ची लस; आता एक डोसमध्ये होणार काम

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लवकरच भारतात एक महत्त्वाची आणि नवीन लस उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील लस कंपनी 'जॉनसन अँड जॉनसन' या कंपनीची सिंगल शॉट व्हॅक्सिन देशामध्ये जुलै महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर्स (इंडिया) जॉनसन अँड जॉनसन कंपनीसोबत चर्चा करत आहेत आणि थेट अमेरिकेतील लस निर्मात्यांकडून खासगीमध्ये लस घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जुलैमध्ये येण्याची शक्यता असलेली ही लस सुरुवातीला थोड्या प्रमाणातच उपलब्ध होईल आणि याचे काही हजारच डोस उपलब्ध असतील. इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याची किंमत भारतात 25 डॉलर (सुमारे 1,850 रुपये) असेल.

जॉन्सन अँड जॉन्सनने याआधीच देशात मॅन्यूफॅक्चरिंग आणि सर्टीफिकेशनसाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु केली आहे. अमेरिकेतील या फार्मास्यूटीकल कंपनीच्या प्रमुखांनी भारतात क्लिनीकल ब्रिजींग रिसर्च सुरु करण्यासाठी एप्रिलच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारशी संपर्क साधला होता. येणाऱ्या काही महिन्यांतच भारतात या लसीला वापरासाठी मंजूरी मिळू शकते.

लस 66.3% टक्क्यांपर्यंत प्रभावी

WHO च्या म्हणण्यानुसार, सौम्य ते मध्यम कोरोनासाठी जॉन्सनची लस 66.3 टक्के प्रभावी आहे तर गंभीर संक्रमणासाठी 76.3 टक्के प्रभावी आहे. ही लस 28 दिवसांनंतर परिणामकारक ठरते. ही लस घेतल्यानंतर कोरोनापासून संरक्षण मिळू शकतं. US FDA ने फेब्रुवारी 2021 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती. मात्र, ही लस घेतल्यानंतर काही जणांना ब्लड क्लॉटींगचा त्रास झाला होता. यानंतर अमेरिकेमध्ये या लशीच्या वापरामध्ये घट झाली होती.

डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी?

जॉन्सन अँड जॉन्सन लस डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटवर किती प्रभावी आहे याबाबत सध्या कोणताही अभ्यास उपलब्ध नाहीये. मात्र, कंपनीचं असं म्हणणं आहे की, सध्या यावर अभ्यास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT