ISRO Satellite Sakal
देश

Joshimath Crisis : १२ दिवसांत ५.४ सेंटीमीटर खचला जोशीमठ; इस्रोने दिला धोक्याचा इशारा

जोशीमठ इथं ७०० हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. तर रस्ते, हॉटेल, दवाखाने यांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जोशीमठ सध्या देशभरासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून जोशीमठच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच जोशीमठ पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.

इस्रोच्या (ISRO) उपग्रहाकडून जोशीमठचा फोटोही जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिवळ्या रंगाने जो भाग दाखवला आहे, तो जोशीमठ शहराचा आहे. यामध्ये आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदीर दाखवण्यात आलं आहे. इस्रोच्या हैद्राबाद इथल्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरकडून हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

सध्या सरकारकडून जोशीमठ इथल्या लोकांना धोकादायक क्षेत्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशीमठ इथं भूस्खलन आणि जमिनीला भेगा पडत असल्याची माहिती मिळत आहे. ७०० हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. तर रस्ते, हॉटेल, दवाखाने यांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत.

इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून ७ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये जोशीमठचे फोटो घेतले आहेत. त्यावर तांत्रिक प्रक्रिया केल्यानंतर लक्षात आलं आहे की कोणता भाग खचला आणि कोणता भाग खचू शकतो. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमीन खचण्याचा वेग कमी होता. या कालावधीत जोशीमठ ८ ते ९ सेंटिमीटरपर्यंत खचला होता. पण २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी २०२३ पर्यंतच्या १२ दिवसांमध्ये ही तीव्रता ५.४ सेटिंमीटर झाली आहे, त्यामुळे जमीन खचण्याचा वेग वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT