देश

गाईचे शेण टाकण्याच्या कारणांवरून फोटो जर्नालिस्टचा गोळ्या घालून खून

वृत्तसंस्था

लखनौ : येथील एका प्रसिद्ध हिंदी दैनिकातील छायाचित्रकाराचा आणि त्याच्या भावाचा त्यांच्या शेजाऱ्यांनी सहारणपूरमध्ये गोळ्या घालून खून केला. शेण टाकण्यावरून झालेल्या वादानंतर ही घटना घडली. या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

आशिष (वय 23) असे या छायाचित्रकाराचे नाव असून, आशुतोष (वय 19) असे त्यांच्या भावाचे नाव आहे. गाईचे शेण टाकण्यावरून या भावांचा त्यांचे शेजारी महिपाल सैनी यांच्याशी वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर चिडलेल्या महिपाल आणि त्यांच्या मुलांनी आशिष यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या भावाला गोळ्या घातल्या. या दोघांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत दोषींना योग्य शासन होईल, अशी ग्वाही दिली. तसेच, मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. विरोधकांनी मात्र ही घटना म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे निदर्शक असल्याचे म्हटले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT