Journalist shot dead in Bihar CM Nitish Kumar orders inquiry crime police sakal
देश

Bihar Crime News : बिहारमध्ये पत्रकाराची गोळ्या घालून हत्या; मुख्यमंत्री नितीशकुमारांचे चौकशीचे आदेश

बिहारच्या अररिया जिल्ह्यामध्ये आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून स्थानिक पत्रकाराची हत्या केल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहारच्या अररिया जिल्ह्यामध्ये आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून स्थानिक पत्रकाराची हत्या केल्याने खळबळ निर्माण झाली असून राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणीगंज बाजार परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त करतानाच ही घटना दुःखद असल्याचे सांगत तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पत्रकारावर अशा पद्धतीने कशा काय गोळ्या झाडल्या जाऊ शकतात? असा सवाल त्यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

‘दैनिक जागरण’चे स्थानिक प्रतिनिधी विमलकुमार यादव (वय ३५) यांची आज पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे हल्लेखोर यादव यांच्या घरी पोचले होते.

हल्लेखोरांनी सुरूवातीला दार वाजविले, यादव यांनी ते दार उघडताच हल्लेखोरांनी त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरूवात केली.

या पत्रकाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून न्यायवैद्यक पथक आणि श्वानपथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शेजाऱ्यांसोबतच्या पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

यादव मुख्य साक्षीदार

दोनच वर्षांपूर्वी यादव यांचे लहान भाऊ आणि सरपंच कुमार शशीभूषण ऊर्फ गब्बू यांची अशाच पद्धतीने गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. विमलकुमार यादव हे त्या खटल्यातील मुख्य साक्षीदार होते. यामुळेच यादव यांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT