warning-over-high-harm-violence-as-homicide-robbery-and-knife-crimes-rise-136428455832202601-180719135037.jpg 
देश

पत्रकाराला भर रस्त्यात भोसकलं, पत्नी आणि 3 मुलींसमोरच संपवलं

सकाळ डिजिटल टीम

गुजरातच्या सुरतमध्ये एका पत्रकाराला चौघांनी भररस्त्यात आडवून धारदार शस्त्रांनी भोसकलंय. ३७ वर्षांच्या या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. चौघांनी त्यांच्या गाडीला धडक दिली. आणि वार केले. यावेळी पठाण यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि तीन मुलीही होत्या. (Journalist Killed in Surat)

पठाण त्याच्या पत्नीसोबत लहान मुलींना घेऊन शहापूर वड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. ते जिलानी पूल ओलांडत असताना एका कारने दुचाकीला मागून धडक दिली आणि कुटुंब रस्त्यावर पडले. चौघांनी तात्काळ गाडीतून खाली उतरून पठाण यांच्या पाठीत चाकूने वार केले. (Surat Journalist Murder)

ज्या दिवशी पठाण यांची हत्या झाली, त्याच दिवशी पोलीस अधीक्षक शरद सिंघल यांनी पत्रकारांना माहिती दिली होती. सोशल मीडियावर शहरात गुन्हेगारी वाढल्याची माहिती परसवण्यात येत असली, तरीही हत्यांचं प्रमाण कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. जानेवारी 2022 मध्ये सुरत शहरात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त दोन खुनाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली.

या हत्येप्रकऱणी रांदेर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पठाण यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. कुटुंबातील सदस्यांनी चार संशयितांची नावं दिल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT