BJP 
देश

भाजपचे नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब; 'हे' घेणार शहांची जागा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीसाठीची औपचारिक प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडणार असून, आज दुपारी जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातून पहिल्यांदाच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निश्‍चित केलेले कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे एकमेव नाव अध्यक्षपदासाठी असल्याने ही निवडणूक बिनविरोध निश्‍चित आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सलग दोनदा स्पष्ट बहुमताने दिल्लीचे तख्त काबीज करणारा पहिला काँग्रेसेतर पक्ष असा विक्रम घडविलेला भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 11 कोटी सदस्य संख्या असलेला जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्षही ठरला आहे.

2014 मध्ये पक्षाध्यक्ष झालेले अमित शहा यांच्याकडे 2019 च्या विजयानंतर मोदींनी क्रमांक दोनच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे दिली. मात्र त्यामुळे शहा यांना पक्षाच्या जबाबदाऱ्यांना पूर्ण वेळ देता येणे अशक्‍य बनले. गृहमंत्रालयाचाही कारभार त्यांना अपेक्षित त्या गतीने चालविण्यात अडथळे येऊ लागल्याचे निदर्शनास आले. याचा फटका पक्षाला अनुक्रमे झारखंड व महाराष्ट्रातील सत्ता गमावणे व सीएए कायद्याच्या संभाव्य विरोधाची पुरेशी पूर्वकल्पना न येणे, या रूपाने बसला असे भाजप नेते मान्य करतात. परिणामी, शहा यांच्याऐवजी नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्याचे दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी निश्‍चित केले. त्यानुसार नड्डा यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. 

निवडणूक अधिकारी व माजी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी हा कार्यक्रम पाहिला. त्यानुसार सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत नड्डा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाची छाननी दुपारी 12.30 ते 1.30 या काळात झाली. त्यानंतरच दुपारी अधिकृत घोषणा करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT