Gautam Adani Billionaires List esakal
देश

Adani-Hindenburg : अदानींना घेरण्यासाठी कधी नव्हे ते सर्व पक्ष आले एकत्र, केली मोठी मागणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अदानी एंटरप्रायझेस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात यावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात केली. (Adani-Hindenburg news in Marathi)

अदानींसह विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, लोकांचे हित आणि एलआयसी, एसबीआयची गुंतवणूक लक्षात घेऊन आम्ही चर्चा करू इच्छित आहोत. अदानी एंटरप्रायझेसची चौकशी जेपीसी स्थापन करून करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली त्याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत खर्गे म्हणाले की, एकदा चौकशी झाली की, अहवाल लोकांसमोर ठेवला पाहिजे जेणेकरून पारदर्शकता येईल आणि लोकांचा विश्वास असेल की त्यांचे पैसे वाचतील.

एलआयसी, एसबीआय आणि इतर सार्वजनिक संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी संयुक्त विरोधकांची मागणी सरकारने मान्य न केल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT