qutub minar Sakal
देश

कुतुबमिनारच्या याचिकेवर 9 जून रोजी निकाल

दिल्लीच्या कुतबमिनार परिसरात पूजाअर्चा करण्यास परवानगी देण्याची मागणी करणाऱया याचिकेवर साकेत न्यायालय येत्या 9 जून रोजी निकाल देणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिल्लीच्या कुतबमिनार परिसरात पूजाअर्चा करण्यास परवानगी देण्याची मागणी करणाऱया याचिकेवर साकेत न्यायालय येत्या 9 जून रोजी निकाल देणार आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या कुतबमिनार परिसरात पूजाअर्चा करण्यास परवानगी देण्याची मागणी करणाऱया याचिकेवर साकेत न्यायालय येत्या 9 जून रोजी निकाल देणार आहे. मात्र 'जेव्हापासून या वास्तूचा ताबा आमच्याकडे आला तेव्हापासून येथे मंदिरे तोडून मीनार किंवा मशीद बनविल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही,' असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) आज झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले. येथे पूजेचा अधिकार देण्याची मागणी सत्र न्यायालयाने आधीच फेटाळून लावली आहे. तो निकाल योग्य होता असे एएसआयच्या वकीलांनी सांगितले.

येथील मंदिरे तोडून कुतुबशहाने कुतुबमीनार उभारला व त्यामुळे येथे पूजाअर्चा करण्यास परवानगी द्यावी, या हिंदू पक्षाच्या दाव्यावर न्यायालयाने, एक संरक्षित स्मारक पूजास्थळात परावर्तीत करण्याची परवानगी तुम्ही मागत आहात का ? जर 800 वर्षे येथे पूजा झालेली नाही तर तुम्ही हे ठिकाण का बदलवू इच्छिता? तुम्ही जो पूजेचा अधिकार मागत आहात तो कसा मिळालेला आहे ? हा मौलिक अधिकार आहे का घटनादत्त अधिकार? त्यावर हिंदू पक्षाच्या वकीलांनी सांगितले की घटनेच्या कलम 25 नुसार धर्मपालनाचा अधिकार प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे. मंदिरे तोडून बनविलेल्या वास्तूला मशीद म्हणणे योग्य आहे काय ? तेथे नमाज अदा केली जात नाही. देशात अनेक संरक्षित धार्मिक स्थळे आहेत जी पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत मग याचा अपवाद करण्याचे कारण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT