देश

भाजप नेते सुरेंद्रन यांना न्यायालयीन कोठडी

अजयकुमार

तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून निर्माण झालेले राजकीय वादळ आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे, भाजपचे सरचिटणीस के. सुरेंद्रन यांना शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला आक्षेप घेत भाजपने शनिवारी राज्यभर आंदोलन करत अनेक ठिकाणी रास्ता रोको केला होता. हिंदू ऐक्‍यवादी नेत्या शशिकला यांच्या अटकेनंतर राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. 

आज माध्यमांशी बोलताना सुरेंद्रन म्हणाले, की पोलिसांनी आपल्यावर हल्ला केला तसेच त्यांनी खाद्यपदार्थ, पाणी आणि औषधेही घेऊ दिली नाहीत. माझ्यावर करण्यात आलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून, राज्य सरकार आपल्याशी सूडबुद्धीने वागत आहे. दरम्यान सुरेंद्रन यांना शनिवारी रात्री पोलिस ठाण्यामध्ये आणल्यानंतर परिसरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सचिवालयाबाहेर जोरदार आंदोलनही केले. कोची, कोट्टायम, तिरुअनंतपुरम येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT