judicial Inquiry into Manipur Violence announcement of Amit Shah politics esakal
देश

Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची न्यायिक चौकशी; गृहमंत्री अमित शहांची घोषणा

शांतता समितीही स्थापणार; राज्यातील हिंसाचार हा जातीय स्वरूपाचा

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज न्यायिक चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा करतानाच राज्यातील हिंसाचार हा जातीय स्वरूपाचा असल्याचे नमूद केले.

उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली हा आयोग काम करेल असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल अनुसूया उईके यांच्या नेतृत्वाखाली शहा यांनी शांती समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली. या समितीमध्ये कुकी, मेईतेई या दोन समाजघटकांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा देखील समावेश असेल.

मणिपूरमधील वादावर तोडगा काढण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग असल्याचे सांगतानाच शहा यांनी हा हिंसाचार घडवून आणण्यासाठी कारस्थान आखण्यात आले होते त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ‘सीबीआय’मार्फत देखील चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.

मणिपूरमध्ये सहा वर्षांपूर्वी भाजप सत्तेत आला होता त्यावेळीच आम्ही या राज्यातील बंद आणि संचारबंदीचे वातावरण दूर केले तसेच येथील अराजकता संपुष्टात आणली. आताही राज्यात गैरसमजातून जातीय संघर्ष झाला आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

हिंसाचार तात्पुरत्या स्वरूपाचा

हिंसाचाराचा हा तात्पुरता टप्पा असून एकदा गैरसमज दूर झाले की परिस्थिती पूर्ववत होईल असे सांगतानाच शहा यांनी भारत- म्यानमार सीमावादाबाबत स्थायी स्वरूपाचा तोडगा काढणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. या दोन्ही देशांच्या सीमांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीमेवरूनच तस्करी

सध्या सीमेवरील पळवाटांचा वापर करूनच अमली पदार्थांची तस्करी केली जात असून येथूनच दहशतवादी कारवाया देखील होत आहेत असे शहा म्हणाले. शेजारी देशांतून येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा गोळा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री शहा यांनी यावेळी मदत छावण्यांना भेट देत कुकी आणि मेईतेई समाजाच्या संघटनांशीही संवाद साधला.

राजीव सिंह पोलिस महासंचालक

त्रिपुरा केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राजीव सिंह यांची मणिपूरचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असेल. याआधी ते ‘सीआरपीएफ’च्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये महासंचालकपदी कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT