Justice Sharad Bobde will accept the post of Chief Justice on November 18
Justice Sharad Bobde will accept the post of Chief Justice on November 18 
देश

न्यायमूर्ती शरद बोबडे 18 नोव्हेंबरला स्विकारणार सरन्यायाधीशपदाची सूत्रे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या सरन्यायाधीपदी होणाऱ्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. आता लवकरच मराठमोळे बोबडे सरन्यायाधीपदाचा कारभार स्विकारतील. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती.

शरद बोबडे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. यापूर्वी सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. रंजन गोगोई यांनी 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. ते 17 नोव्हेंबरला निवृत्त होतील. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.

आता 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्विकारतील. बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही शरद अरविंद बोबडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

23 एप्रिलला निवृत्ती
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे गेली अनेक वर्षे विधी क्षेत्रात आहेत. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी झाली तर ते सरन्यायाधीश म्हणून सुमारे 523 दिवस असणार आहेत.

बोबडे दुसरे न्यायाधीश
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT